70th National Film Awards : दिल्लीतील विज्ञान भवनात नुकताच ७०वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा दिमाखात पार पडला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते मनोरंजन विश्वातील दिग्गज व्यक्तिमत्त्वांचा सन्मान करण्यात आला. यंदाचा सर्वात प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना देण्यात आला. रणबीर कपूर स्टारर ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटासाठी प्रीतमला सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शकाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. ऋषभ शेट्टीला ‘कांतारा’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्या पुरस्कार देण्यात आला. ए.आर. रहमान यांना ‘पोन्नियिन सेल्वन १’साठी सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक म्हणून गौरवण्यात आले.