आज देशातील लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा पार पडणार आहे. महाराष्ट्रातील जवळपास ११ मतदार संघात आज मतदान प्रक्रिया सुरु झाली आहे. दिग्गजांपासून, कलाकारांपासून ते सर्वसामान्य सर्वजण मतदानासाठी बाहेर पडताना दिसत आहेत. तेलंगणा येथे साऊथमधील सुपरस्टार ज्युनिअर एनटीआर आणि अल्लू अर्जुन यांनी मतदान केले आहे.