Jheel Mehta: ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेमध्ये ‘सोनू’च्या भूमिकेत दिसलेली अभिनेत्री झील मेहता आता लवकरच बोहल्यावर चढणार आहे. खुद्द अभिनेत्रीनेच या वृत्ताला मान्यता दिली आहे. तिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. या व्हिडीओमध्ये झील मेहताचा बॉयफ्रेंड तिला लग्नासाठी प्रपोज करताना दिसला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी आता सोनूला टप्पू मिळाल्याचे म्हणत आहेत.