टी-20 विश्वचषक जिंकून आलेल्या भारतीय क्रिकेटपटूंचं गुरुवारी भारतात जोरदार स्वागत झालं. सर्वप्रथम दिल्ली टीम इंडियानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यानंतर मुंबईत संपूर्ण संघाची विजयी मिरवणूक काढण्यात आली. आता आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईकर खेळाडूंची भेट घेतली आणि त्यांचा सत्कार केला. मुख्यमंत्र्यांच्या भेटीला कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जैस्वाल उपस्थित होते.