Swapnil Joshi And Prarthana Behere: नऊ वर्षांपूर्वी आलेल्या ‘मितवा’ या चित्रपटात स्वप्निल जोशी आणि प्रार्थना बेहेरे ही जोडी झळकली होती. या जोडीला प्रेक्षकांचे भरपूर प्रेम देखील मिळाले होते. आता या चित्रपटाच्या इतक्या वर्षानंतर पुन्हा एकदा स्वप्निल जोशी आणि प्रार्थना बेहेरे एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. त्यांच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले असून, नुकताच त्यांनी एक बीटीएस व्हिडीओ शेअर केला आहे.