Video: लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या घरचा बाप्पा; स्वानंदी-अभिनयसह प्रिया बेर्डेंनी केली आरती!
Swanandi Berde:सध्या सगळीकडे आनंद आणि जल्लोषाचं वातावरण आहे. कारणही अगदी तसंच आहे. सध्या सगळीकडे बाप्पाच्या आगमनाने वातावरण अगदी जल्लोषाने भरून गेलं आहे. सगळीकडेच बाप्पाची गाणी ऐकू येत आहेत. कलाकारांच्या घरी देखील बाप्पा विराजमान झाला आहे. स्वानंदी बेर्डे हिने आपल्या घरच्या गणपती बाप्पाची झलक देखील दाखवली आहे. यावेळी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या घरातील बाप्पाची पूजा करताना संपूर्ण बेर्डे कुटुंब दिसले आहे.