स्वामी समर्थ यांचा प्रकटदिन १० एप्रिल रोजी संपूर्ण महाराष्ट्रात साजरा करण्यात आला. अनेकांनी स्वामींच्या मठात जाऊन स्वामींची सेवा केली. मराठमोळा अभिनेता स्वप्नील जोशी याने देखील घरात स्वामी समर्थ प्रकटदिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.