Supriya Sule Speech: अजित पवार यांच्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये उभी फुट पडल्यानंतर आज शरद पवार समर्थकांच्या मेळाव्यात पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी धडाकेबाज भाषण केलं. घरात अडचण निर्माण होते तेव्हा मुलगीच वडिलांना आधार देते. माझ्या आईबाबाविषयी काहीही ऐकूण घेणार नाही, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.