supriya sule video : लोकसभा निवडणुकीत बारामतीची जागा दणदणीत मतांनी जिंकल्यानंतर बारामतीकरांचे आभार मानण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी पहिली जाहीर सभा घेतली. यावेळी सुप्रिया सुळे यांनी पवार कुटुंबातील सर्व सदस्यांसह तमाम बारामतीकरांचे आभार मानले. सगळंच किती दिवस मनात ठेवायचं असं सांगत सुप्रिया सुळे यांनी नाव घेऊन काही लोकांचे विशेष आभार मानले.