सोनी मराठी वाहिनीवर नव्या मालिकेचा एक प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा प्रोमो पाहून प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत आणि प्रेक्षक आश्चर्यचकित झाले आहेत. मालिकेचे नाव आहे ‘तू भेटशी नव्याने’. या मालिकेत सुबोध भावे आणि शिवानी सोनार यांची नवी कोरी जोडी प्रेक्षकांना पाहता येणार आहे. मालिकेत AIचा वापर करुन सुबोध भावे तरुणपणी कसा दिसायचा हे दाखवण्यात आले आहे.