Stone Pelting On Vande Bharat Express In Ayodhya : गोरखपूरहून लखनौच्या दिशेने येणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसवर अज्ञात आरोपींनी तुफान दगडफेक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दोन दिवसांपूर्वी अयोध्या शहर परिसरात रेल्वेने सहा शेळ्या उडवल्याच्या रागातून आरोपींनी सोहवाल रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेवर दगडफेक केली आहे. त्यात दोन डब्यांचा काचा फुटल्या आहे. सुदैवाने आरोपींच्या हल्ल्यात कोणत्याही प्रवाशाला इजा झालेली नाही. त्यानंतर आता पोलिसांनी या प्रकरणात तीन आरोपींना अटक करत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.