rahul gandhi video : केंद्रात नवं सरकार स्थापन होण्याआधीच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी व अमित शहा यांना मोठा दणका दिला आहे. राहुल गांधी यांनी मोदी-शहा व अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर घोटाळ्याचा आरोप केला आहे. मार्केट वधारणार असल्याचं सांगून निवडणुकीच्या काळात नरेंद्र मोदी व अमित शहा यांनी लोकांना शेअर खरेदी करण्यासाठी प्रोत्साहित केलं. भाजपला बहुमत मिळणार नाही हे माहीत असताना एक्झिट पोलवाल्यांच्या मदतीनं खोटे पोल प्रसिद्ध करण्यात आले. त्यामुळं सुमारे ५ कोटी छोट्या-मोठ्या गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर शेअर खरेदी केली. त्यात त्यांचं ३० लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं. हा सरळ-सरळ घोटाळा आहे. या घोटाळ्यांची संयुक्त संसदीय समितीच्या मार्फत चौकशी व्हायला हवी, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे.