Malegaon Nashik Theatre Viral Video : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या जवान चित्रपटाची सध्या चांगलीच क्रेझ पाहायला मिळत आहे. अनेक थिएटर फुल्ल असून शाहरुखचे चाहते मोठ्या संख्येने जवान चित्रपट पाहत आहे. परंतु आता याच चित्रपटाचा शो सुरू असताना थिएटरमध्ये फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना नाशिक जिल्ह्यातील मालेगावात घडल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळं आता पोलिसांकडून शाहरुखच्या अतिउत्साही चाहत्यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.