बॉलिवूड अभिनेता सोनू सूद हा भारतीय सुपरहिरो म्हणून ओळखला जातो. सोनू सूदने चाहत्यांची करत असलेली मदत ही अतिशय प्रशंसनीय आहे. काल ३० जुलै रोजी सोनू सूदचा वाढदिवस होता. त्यासाठी चाहत्यांनी जय्यत तयारी केली होती. सोनू सूदने देखील चाहत्यांसोबत केक कापून वाढदिवस साजरा केला.