बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर ही कायमच तिच्या लूकमुळे चर्चेत असते. सध्या सोशल मीडियावर सोनमचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ फोटोग्राफर अपेक्षा मकेरच्या रिसेप्शन पार्टीमधील आहे. या पार्टीला सोनमने लाल रंगाची पारंपरिक गुजराती साडी नेसली होती. त्यावर सुंदर अशी ज्वेलरी घातली होती. या लूकमध्ये सोनम अतिशय सुंदर दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर सोनमता हा व्हिडीओ सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.