Shraddha Kapoor: बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर सतत कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असते. कधी तिच्या आगामी चित्रपटांमुळे तर कधी खासगी आयुष्यामुळे. काही दिवसांपूर्वीच तिचा नवा लूक सर्वांसमोर आला होता. आता सध्या सोशल मीडियावर तिचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ती फोटोग्राफर्सशी मराठीत बोलताना दिसत आहे.