Shraddha Kapoor new car: बॉलिवूड कलाकार हे त्यांच्या सिनेमांसोबतच लग्झरी लाइफसाठी ओळखले जातात. नुकताच बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरने नवी कोरी लॅम्बोर्गिनी खरेदी केली आहे. ही लाल रंगाची लग्झरी कार पाहून चाहते आनंदी झाले आहे. फोटोग्राफर्सशी कारविषयी बोलताना श्रद्धा म्हणाली की ही 'गाडी नाही रथ आहे.' तिचा हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल झाला आहे.