Shraddha Kapoor Birthday Celebration: बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर यांचा ‘तू झुठी मैं मक्कार’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यादरम्यान अभिनेत्री श्रद्धा कपूर चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये प्रचंड व्यस्त आहे. नुकताच अभिनेत्रीचा वाढदिवस देखील झाला. प्रमोशन इव्हेंटवरून श्रद्धा नुकतीच मुंबईत परतली. यावेळी चाहत्यांनी विमानतळावरच केक कापून श्रद्धाचं बर्थडे सेलिब्रेशन केलं.