Shiv Thakare: ‘बिग बॉस ओटीटी २’ या वादग्रस्त शोने आता प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. या शोमध्ये सहभागी झालेला स्पर्धक एल्विश यादव याने ‘बिग बॉस ओटीटी २’चे विजेतेपद पटकावले आहे. वाईल्डकार्ड एन्ट्री म्हणून या घरात आलेल्या एल्विश यादवने ट्रॉफी पटकावत नवा इतिहास रचला आहे. आतापर्यंत एकदाही वाईल्डकार्ड म्हणून आलेल्या स्पर्धकाने ट्रॉफी जिंकली नव्हती. यामुळेच एल्विशचं खूप कौतुक होत आहे. ‘बिग बॉस’ फेम शिव ठाकरे याने देखील एल्विश यादवचं कौतुक केलं आहे.