Shiv Thakare And Abdu Rozik: ‘बिग बॉस’च्या घरात शिव ठाकरे आणि अब्दू रोजिक यांची दोस्ती चांगलीच गाजली होती. घरातून बाहेर पडल्यावरदेखील त्यांच्यातील मैत्री अशीच कायम टिकून राहिली आहे. अब्दू रोजिक याने नुकतेच मुंबईत स्वतःचे रेस्टॉरंट सुरू केले आहे. याच्या उद्घाटनाला शिव ठाकरे याने देखील उपस्थिती लावली. यावेळी पुन्हा एकदा दोघांची दोस्ती दिसली. शिव ठाकरेने अब्दू रोजिकला त्याच्या रेस्टॉरंटसाठी शुभेच्छा दिल्या. तर, अब्दूने शिवला ‘खतरों के खिलाडी’साठी भरभरून शुभेच्छा दिल्या.