आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाला आता अवघा एक दिवस उरला आहे. या निमित्ताने सगळेच बाप्पाच्या आगमनाच्या तयारीत गुंतले आहेत. सेलिब्रिटी देखील बाप्पाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. बिग बॉसमधून घराघरात पोहोचलेला अभिनेता शिव ठाकरेच्या घरी गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. त्याने पोलिसांच्या वर्दीत असलेल्या गणपती बाप्पाची मूर्ती आणली आहे. सध्या सोशल मीडियावर शिवचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.