Vaibhav Naik Vs Narayan Rane : रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यातील बारसू रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांकडून होत असलेल्या विरोधानंतर आता राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले आहेत. बारसूच्या मुद्द्यावर शिवसेनेला आव्हान देणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं आव्हान शिवसेनेनं स्वीकारलं आहे. उद्धव ठाकरे यांना आव्हान देण्याचं सोडा, हिंमत असेल तर आम्हाला बारसूमध्ये जाण्यापासून अडवून दाखवा, असं आव्हान आमदार वैभव नाईक यांनी दिलं आहे. उद्धव ठाकरे हे कोकणात येणारच आहेत, कोकण त्यांचं स्वागत मोठ्या दिमाखात करेल, असंही नाईक यांनी म्हटलं आहे.