Uddhav Thackeray Video : मुंबई पदवीधर मतदारसंघाचे शिवसेना (उद्धव बाळासाहे ठाकरे) पक्षाचे उमेदवार अनिल परब यांच्या संकल्पपत्राचं प्रकाशन केल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मातोश्री निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी काही राजकीय प्रश्नांनाही उत्तरं दिली. मोहन भागवत यांनी मणिपूरमधील परिस्थितीबद्दल मांडलेल्या मतावरही त्यांनी भाष्य केलं. मोहन भागवत वर्षभरानंतर बोलले हे काही कमी नाही.मात्र आता तरी त्यांचं बोलणं नरेंद्र मोदी गांभीर्यानं घेणार आहेत का, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी केला.