Shilpa Shetty Kundra: बॉलिवूड अभिनेत्री आणि फिटनेस आयकॉन शिल्पा शेट्टी-कुंद्राने तिच्या राजस्थान ट्रिप दरम्यान काहीतरी भन्नाट गोष्ट करण्याचा अनुभव घेतला आहे. राजस्थानची सांस्कृतिक समृद्धी पाहून शिल्पा भारावून गेली होती. यावेळी तिने जात्यावर पीठ दळताना एका महिलेला पाहिलं आणि शिल्पाला देखील मोह आवरला नाही. शिल्पाने देखील लगेचच जात्यावर पीठ दळायला सुरुवात केली.