Shilpa Shetty: दीड दिवसाचा मुक्काम असणारे गणपती बाप्पा आज पुन्हा परतीच्या प्रवासाला निघाले आहेत. बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी विराजमान झालेले बाप्पा देखील दीड दिवसांचेच होते. आता दीड दिवसांच्या जल्लोष आणि आनंदी वातावरणातून आता बाप्पा सगळ्यांचा निरोप घेणार आहेत. शिल्पा शेट्टीने देखील आता आपल्या घरातील बाप्पांना निरोप दिला आहे. यावेळी शिल्पा शेट्टीसह तिचे संपूर्ण कुटुंब देखील हजर होते. सगळ्यांनी गुलाबी रंगाचे आउटफिट परिधान केले होते.