बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी कायमच चर्चेत असते. ती व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढून कुटुंबीयांसोबत फिरायला जाताना दिसते. विमानतळावरील तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक चाहता अचानक येतो आणि शिल्पाचा पती करणसोबत फोटो काढण्यासाठी त्याच्या मागे लागतो. पण शिल्पाचा बॉडीगार्ड त्याला लांब करतो. लगेच शिल्पा बॉडीगार्डला थांबवते. तिचा हा व्हिडीओ सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.