आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावं अशी मागणी केली आहे. तर, ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण देण्यास ओबीसी संघटनांनी विरोध केला आहे. त्यातून राज्याच्या गावा-खेड्यांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. महाराष्ट्रातील हा वाद थांबवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला पाहिजे, असं आवाहन वंचित बहुजन आघाडीनं केलं आहे.