Sharad Pawar on Sinhasan Movie: राजकारणावर अचूक भाष्य करणारा डॉ. जब्बार पटेल दिग्दर्शित ‘सिंहासन’ हा मराठी चित्रपट प्रचंड गाजला होता. आजही प्रासंगिक वाटणाऱ्या ‘सिंहासन’ला प्रदर्शित होऊन ४४ वर्ष झाली आहेत. या सिनेमावर चर्चा करण्यासाठी मुंबईत आयोजित चर्चासत्रात सिनेमाचे दिग्दर्शक जब्बार पटेल, अभिनेते मोहन आगाशे, नाना पाटेकर यांच्यासोबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हेसुद्धा सामील झाले होते. तब्बल ४४ वर्षापूर्वी प्रदर्शित झालेल्या, राजकारणवर भाष्य करणाऱ्या ‘सिंहासन’ चित्रपटाबद्दल शरद पवार भरभरून बोलले.