Shah Rukh Khan: सध्या शाहरुख खान त्याच्या तब्येतीमुळे चर्चेत आला आहे. दरम्यान आता शाहरुख खानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो आजारी असतानाही चाहत्यांना भेटताना दिसला आहे. प्लेऑफचा सामना पाहिल्यानंतर निघण्याच्या घाईत असताना देखील शाहरुख खान आपल्या अपंग चाहत्याला बघून थांबला. इतकंच नाही तर, त्या व्हिलचेअरवर बसलेल्या चाहत्याजवळ जाऊन शाहरुख खानने त्याची गळाभेट घेतली. आजारी असूनही अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या सामन्यानंतर अभिनेता व्हीलचेअरवर बसलेल्या त्याच्या चाहत्याला भेटला. हा व्हिडीओ पाहून चाहते त्याचं कौतुक करत आहेत.