Anant Ambani Pre wedding: गुजरातच्या जामनगरमध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग सोहळ्याची धमाकेदार सुरुवात झाली आहे. या सोहळ्यात जगभरातील अनेक प्रतिष्ठीत मंडळी सहभागी झाली आहेत. राधिका आणि अनंत यांच्या प्री-वेडिंग सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी देखील अनेक कार्यक्रम ठेवण्यात आले होते. यावेळी बॉलिवूडची ‘खान’ मंडळी अर्थात अभिनेता शाहरुख ख, सलमान खान आणि आमिर खान यांनी यावेळी धमाकेदार डान्स केला. ‘आरआरआर’च्या ‘नाटू नाटू’ गाण्यावर त्यांनी आपल्याच अंदाजात ताल धरला होता.