Video: शाहरुख खान आणि अबरामने घेतली लालबागच्या राजाचं दर्शन; स्वतःच्या हाताने लेकाला लावला टिळा!
Shah Rukh Khan At Lalbaugcha Raja: बॉलिवूड किंग शाहरुख खान नुकतेच लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. यावेळी त्याचा मुलगा अबराम खानदेखील त्याच्यासोबत होता. शाहरुखचा छोटा मुलगा अबराम हा सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. यावेळी शाहरुख खानने पांढऱ्या रंगाचा कुर्ता परिधान केला होता. डोळ्यांवर गॉगल आणि केस बांधलेल्या लूकमध्ये शाहरुखने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. शाहरुख खानला पाहण्यासाठी त्याच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली. शाहरुखने यावेळी स्वतः अबरामच्या कपाळी टिळा लावला.