Dr Amol Kolhe: महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये 'बैलगाडा' शर्यतींचं आयोजन केलं जातं. याच खेळाचा थरार आता प्रेक्षकांना एका गाण्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला आहे. नुकतंच हे मराठमोळं रांगडं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. प्रसिद्ध गायक आदर्श शिंदे यांच्या आवाजातील 'आला बैलगाडा' हे गाणं बघून अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांच्या डोळ्यांत पाणी आलं आहे. भावुक झालेल्या डॉ. अमोल कोल्हे यांनी या गाण्याचं कौतुक करताना एक किस्सा देखील सांगितला आहे.