मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Turtle Festival: रत्नागिरीमधल्या 'वेळास' गावामध्ये रंगला कासव फेस्टिवल!

Turtle Festival: रत्नागिरीमधल्या 'वेळास' गावामध्ये रंगला कासव फेस्टिवल!

Mar 21, 2023 02:34 PM IST Tejashree Tanaji Gaikwad
Mar 21, 2023 02:34 PM IST

वेळास हे रत्नागिरी जिल्ह्याच्या उत्तरेकडील मंडणगड तालुक्यातील गावआहे. गावात दरवर्षी मार्च ते एप्रिल दरम्यान कासव महोत्सव होतो. वाळूवरील कासवांच्या पावलांच्या ठशांचा माग काढून काही लोक अंडी काढून त्यांची चोरी करत असत. स्थानिक ग्रामस्थ, वन विभाग तसेच सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेच्या जनजागृतीने त्याला आळा बसला. त्यासाठी कासव महोत्सव सुरू केला. गावातील महिला बचत गटाच्या सदस्यांनाही कासव संवर्धन प्रकल्पातून चांगला रोजगार मिळतो. २००६ सालापासून सागरी कासव संवर्धनाचे काम सातत्याने सुरू आहे. महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर या कामातून हजारहून अधिक घरटी संरक्षित केली असून, ५० हजारांपेक्षा अधिक पिल्ले समुद्रात सोडण्यात आली आहेत.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp