Sanjay Raut on Modi Shah : मुंबईतील वरळी इथं झालेल्या शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे गट) राज्यव्यापी शिबिरात खासदार संजय राऊत यांनी जोरदार भाषण केलं. त्यांनी यावेळी शिंदे गट आणि भाजपवर जोरदार हल्ला चढवला. दिल्लीतून मोठमोठे नेते इथं येऊन मुंबईचा कब्जा घेण्याच्या बाता मारतायत, पण कब्जा घ्यायला मुंबई तुमच्या बापाची आहे का?, असा सवाल राऊत यांनी केला. शिंदे गट म्हणजे जत्रेतल्या चंद्र-सूर्यासारखा आहे. काही दिवस लोक फोटो काढतील, पण खरी शिवसेना एकच. हे अब्दुल सत्तार यांचं बोगस बियाणं नाही. बाळासाहेबांना पेरलेल्या असली बियाण्यांचं पीक आहे. त्या पेरलेल्या बियाण्यातून उगवलेल्या या ठिणग्या आहेत. जोपर्यंत बाळासाहेब ठाकरे नावाचा बाप आमच्या पाठिशी आहे, तोपर्यंत शिवसेना कुणालाही चोरता येणार नाही, असा घणाघात संजय राऊत यांनी केला.