दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेत्री समांथा रुथ प्रभू सतत सर्वांचे लक्ष वेधून घेत असते. तिच्या प्रत्येक चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला आहे. समांथा लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. तिने या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले आहे. दरम्यान, तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमधील कृती पाहून चाहत्यांनी तिचे कौतुक केले आहे.