Video: विमानतळावर वाट पाहणाऱ्या चिमुकल्या चाहत्याला सलमान खानने मारली मिठी!
Salman Khan: बॉलिवूडचा ‘दबंग’ अर्थात सलमान खान नुकताच मुंबई विमानतळावर स्पॉट झाला होता. यावेळी त्याने आपली वाट पाहणाऱ्या एका चिमुकल्या चाहत्याची गळाभेट घेतली. त्यांचा हा व्हिडी सध्या चर्चेत आला आहे. या चिमुकल्या चाहत्याची गळाभेट घेताना सलमान देखील आनंदी दिसत होता. घाईगडबडीत असताना देखील त्याने थांबून आपला चाहत्याला वेळ दिल्याने सलमान खानचे कौतुक होत आहे. या लहान मुलासोबत थांबून फोटो काढल्यानंतरच सलमान त्याच्या पुढच्या प्रवासाला रवाना झाला.