प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री करीना कपूर खान हे कायमच चर्चेत असतात. फोटोग्राफर त्यांचे फोटो काढण्यासाठी सतत मागे फिरत असतात. नुकताच सैफ हा करीना आणि त्याचा मुलगा जेह यांच्यासोबत स्पॉट झाला. यावेळी काही पापाराझींनी जेह आणि सैफचे फोटो क्लिक केले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये सैफ हा पापाराझीवर भडकलेला दिसत आहे.