Sai Tamhankar: देशभरात मकर संक्रांतीचा सण मोठ्या जल्लोषात साजरा केला गेला. या निमित्ताने कलाकारांनी देखील आपापल्या खास अंदाजात मकर संक्रांती साजरी केली. अभिनेत्री सई ताम्हणकर हिने देखील पापाराझींना तिळगुळ वाटले आहेत. मुंबईतील एका स्टुडीओमध्ये स्पॉट झालेली अभिनेत्री स्वतःसोबत तिळाचे लाडू घेऊन आली होती. यावेळी तिने सगळ्यांना लाडू वाटून मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी आलेल्या नंदीला देखील तिने लाडू भरवला.