Sahi Re Sahi Marathi Play: अभिनेते भरत जाधव यांच्या 'सही रे सही' नाटकाचा १५ ऑगस्ट २०२४ला ४४४४वा प्रयोग झाला. या प्रयोगाला राज ठाकरे यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी भरत जाधव यांचं तोंडभरून कौतुक केलं. ‘सही रे सही' नाटकाने भरत जाधवांना लोकप्रियतेच्या शिखरावर नेलं. अर्थात 'सही रे सही' हे एक नाटक झालंच पण यापलीकडे जाऊन इतरपण अनेक नाटकांनी प्रसिद्धीचा पाया रचला. पण 'सही रे सही'ने अत्युच्च लोकप्रियता दिली. इतकी लोकप्रियता मिळून देखील भरत जाधव यांचे पाय जमिनीवर आहेत, कुठलाही अहंगंड नाही. भरत जाधव माझे खूप चांगले मित्र आहेत. असा मित्र मिळणे हे माझं भाग्य आहे’, असे राज ठाकरे म्हणाले.