Akshay Kumar: सद्गुरुंनी अक्षय कुमार याचा चित्रपट पाहिल्यानंतर ट्विटरवर पोस्ट करत आपला अनुभव सांगितला आहे. सद्गुरूंनी एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ते आणि अक्षय कुमार दोघेही एका मोकळ्या मैदानात डिस्क खेळताना दिसत आहेत. हा व्हिडीओ पोस्ट करताना सद्गुरुंनी कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘तुमची ईशा योग केंद्राला भेट आणि तुम्ही ओएमजी२ बद्दल जे सांगितले ते खूप छान होते.’