टीव्ही विश्वाची लाडकी 'छोटी बहू' अर्थात अभिनेत्री रुबिना दिलैक काही दिवसांपूर्वी आई झाली. तिने जुळ्या मुलींना जन्म दिला. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत रुबिनाने ही गोड न्यूज दिली. आता एका पुरस्कार सोहळ्याला रुबिनाने हजेरी लावली. त्यावेळी तिने परिधान केलेल्या वनपिसने सर्वांचे लक्ष वेधले. या वनपिसमध्ये रुबिना ही स्लिम दिसत असल्यामुळे चाहत्यांनी कौतुक केले आहे.