Revanth Reddy Oath Ceremony : काँग्रेस नेते रेवंत रेड्डी तेलंगणाचे नवे मुख्यमंत्री बनले आहे. हैदराबाद शहरातील LB स्टेडियममध्ये आयोजित भव्य कार्यक्रमात तेलंगणाच्या राज्यपाल टी. सौंदरराजन यांनी त्यांनी पद गोपनीयतेची शपथ दिली. रेवंत रेड्डी यांच्यासह १० मंत्र्यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. भट्टी विक्रमार्क यांनी उपमुख्यमंत्री बनवले आहे.