Rasha Thadani and Arhaan Khan: अर्जुन कपूरसोबत ब्रेकअप आणि पॅचअपच्या अफवांमुळे मलायका रोजच चर्चेत असते. त्याचवेळी अरबाज खानने नुकतेच शूरा खानसोबत लग्न करून सगळ्यांनाच धक्का दिला होता. आता त्यांचा मुलगा अरहान खान हा देखील त्याच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत आला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याचे नाव अभिनेत्री रवीना टंडन हिची मुलगी राशा थडानीसोबत जोडले जात आहे.