Ranveer And Kriti: बनारसमध्ये झालेल्या फॅशन शोमध्ये बॉलिवूडचे सुपरस्टार्स सहभागी झाले होते. प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी आयोजित केलेल्या ‘बनारस साडी फॅशन’मध्ये रणवीर सिंह, क्रिती सेनससह अनेक स्टार्स सहभागी झाले होते. या फॅशन शोमध्ये क्रिती सेनन आणि रणवीर सिंह यांनी आपल्या आऊटफिट्सनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. दोघांच्याही रॉयल लूकवर सगळ्यांच्या नजरा खिळल्या होत्या. यावेळी रणवीरने क्रितीचा हात धरून रॅम्पवॉक केला.