Randeep Hooda Wedding: बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा आणि त्याची प्रेयसी लिन लैशराम आता विवाह बंधनात अडकले आहेत. बुधवारी २९ नोव्हेंबर रोजी मणिपूरमधील इंफाळमध्ये या दोघांनी पारंपारिक पद्धतीने विवाह रचला आहे. या लग्नसोहळ्यात दोघेही मणिपुरी पारंपरिक वधू-वरांच्या पोशाखात दिसले. या खास सोहळ्यासाठी रणदीप पांढऱ्या धोतर आणि कुर्त्यामध्ये मॅचिंग पगडी परिधान करून दिसला. तर, दुसरीकडे लिनही पारंपरिक मणिपुरी वधू वेशात दिसली.