Ranbir Kapoor: घरगुती गणपती बाप्पांच्या विसर्जनाला आता सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी पाच तर काही ठिकाणी सहा दिवसांचा मुक्काम करून आता बाप्पा परतीच्या प्रवासाला निघाले आहेत. बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर यांच्या घरी गणपती बाप्पांचे पाच दिवसासाठी आगमन झाले होते. नुकताच त्याने आपल्या आईसोबत गणपती बाप्पाचं विसर्जन केलं. मात्र, या वर्षी देखील विसर्जनाला आलिया भट्ट गैरहजर होती. यामुळे पुन्हा एकदा वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे.