Ranbir Kapoor Ganpati Visarjan: बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि त्याची आई नीतू कपूर यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये रणबीर आणि नीतू कपूर गणपती विसर्जनासाठी जाताना दिसले आहेत. व्हिडीओमध्ये रणबीर कपूरने आधी बाप्पाची आरती केली आणि नंतर बाप्पाची मूर्ती विसर्जनाला नेण्यासाठी गाडीत घेऊन बसताना दिसला आहे.