Ranbir Kapoor And Raha: रणबीर आणि राहा यांची एक छोटीशी झलक इंटरनेटवर व्हायरल होत आहे. दोघेही सोमवारी संध्याकाळी मुंबईतील कलिना विमानतळावर स्पॉट झाले होते. या व्हिडीओमध्ये ‘पापा’ रणबीर कपूर लेक राहाला आपल्या कुशीत घेऊन गाडीत बसताना दिसत आहेत. यादरम्यान रणबीरने मुलीचा चेहरा हाताने लपवला आहे. अभिनेता काळ्या रंगाच्या आऊटफिटमध्ये, तर बेबी राहा पांढऱ्या कपड्यात दिसत आहे.