Arun Govil In Ayodhya: अयोध्येच्या श्रीराम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा मोठ्या जल्लोषात होणार असून, या सोहळ्यासाठी अभिनेते अरुण गोविल यांना देखील निमंत्रण देण्यात आलं होतं. या भव्य दिव्य ऐतिहासिक सोहळ्याला हजेरी लावण्यासाठी स्वतः अरुण गोविल अयोध्येला रवाना झाले आहेत. रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठेसाठी अयोध्येला रवाना झालेल्या अरुण गोविल यांना पाहताच चाहत्यांनी विमानतळावरच त्यांच्या पाया पडण्यास सुरुवात केली. खऱ्या आयुष्यात देखील त्यांना आजही चाहते भगवान राम समजत आहेत.