Rakhi Sawant: अभिनेत्री राखी सावंत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. राखी सावंत दुबईत असल्यामुळे बराच काळ पापाराझी कॅमेऱ्यांपासून दूर होती. पण, आता अभिनेत्री परत भारतात आली आहे. मुंबईत परतल्यानंतर राखी सावंत वेगवेगळ्या ठिकाणी स्पॉट होत आहे. नुकतीच ती जिमच्या बाहेर स्पॉट झाली होती. यावेळी अभिनेत्रीसोबत दिसणाऱ्या व्यक्तीवर यापूर्वी तिने अनेक गंभीर आरोप केले होते. हा व्यक्ती दुसरा-तिसरा कोणी नसून, राखी सावंतचा पूर्वपती रितेश सिंह आहे.